Pimpri News : नाट्य परिषदेची पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणि (Pimpri News) मेघराज राजेभोसले यांच्या विनंतीस मान देऊन इतर 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पुण्यातील नाट्य परिषदेची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटनेची पंचवार्षिक निवडणूक 2023-28 साठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी 21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. त्यासाठी नाट्य परिषदेच्या पुणे मतदारसंघातून एकूण 20 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष  भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणि मेघराज राजेभोसले यांच्या सहकार्याने ही निवडणूक पुणे मतदारसंघामध्ये बिनविरोध झाली आहे.

PCMC : संप मागे! महापालिकेचे कामकाज पूर्वपदावर

निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 9 ते 11 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी होता. त्यानुसार भोईर आणि राजेभोसले यांच्या विनंतीस मान देऊन इतर 13 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पुण्यातील नाट्य परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.(Pimpri News) नाट्य परिषदेची पुणे विभागाची मागील पंचवार्षिक निवडणूक सन 2018-23 सुद्धा भाऊसाहेब भोईर यांच्या प्रयत्नातून बिनविरोध झाली होती. ही निवडणूक बिनविरोध पार पडण्यास आपला अर्ज मागे घेऊन सहकार्य केलेल्या सर्व उमेदवारांचे, रंगकर्मींचे व सहकार्य करण्याऱ्या पुणे विभागातील नाट्य परिषदेच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, शिरूर, दौंड, कोथरूड, बारामती आणि इंदापूर शाखांचे पदाधिकारी, सदस्य यांचे सर्व बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी आभार मानले.

बिनविरोध निवड झालेले सदस्य

भाऊसाहेब सोपानराव भोईर,  मेघराज शहाजीराव राजेभोसले, सुहास दामोदर जोशी,  सुरेश धोंडीबा धोत्रे,  शंकर (दिपक) दिनकर रेगे, सत्यजित बाळकृष्ण धांडेकर,  समीर पुरुषोत्तम हम्पी हे बिनविरोध निवडून आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.