Pune division teachers constituency election :  शिक्षक मतदार संघात जयंत आसगावकर विजयी घोषित

एमपीसी न्यूज : पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सायंकाळी सातच्या सुमारास जाहीर केले.

या निवडणुकीत आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. विजयासाठी 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे आसगावकर यांना 34 व्या फेरीत विजयी म्हणून घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांना 15357 मते मिळाली.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.