Sports News : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभाग अजिंक्य

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एकमध्ये 17 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभागाच्या मुंलींच्या संघाने नाशिक विभागाच्या संघाला 30 -16 असे पराभूत करून विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत पुणे, नाशिक, नागपूर व मुंबई विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. ही स्पर्धा सुपरलीग पध्दतीने खेळविण्यात आली होती. यात यजमान पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने नाशिक विभाग संघावर सुरवातीपासुनच वेगवान व आक्रमक खेळ करीत दबाव टाकला होता. त्याचा फायदा त्यांना झाला.मध्यंतराला पुणे विभागाकडे 16 – 9 अशी आघाडी होती. पुणे संघाने मध्यंतरापुर्वी 3 बोनस व मध्यंतरानंतर 2 बोनस गुण वसुल केले होते.

Spartan Monsoon League : सॅफरॉन क्रिकेट क्लबची विजयाची हॅट्रीक; कल्याण क्रिकेट क्लबचा विजयाचा चौकार

मध्यंतरानंतर एक लोन देखील लावला, त्यामुळे सामन्यावर पुणे विभागाने आपली पकड घट्ट केली होती. पुणे विभागाच्या सानिक्षा भोसले व रंजिता घसारी यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजयाकडे नेले तर प्राप्ती निकम हिने चांगल्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. नाशिक विभाग संघाच्या देवश्री सोनार हिने एकाकी झुंज दिली. मध्यंतरानंतर ती थकल्याने तिला अपेक्षीत यश मिळाले नाही. साक्षी काळे व परिनिती निरभवन यांनी चांगल्या पकडी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.