रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune Divisional Corona Update : पुणे विभागात 23 हजार 875 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे विभागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 49 हजार 408 झाली आहे. त्यापैकी 6 लाख 8 हजार 987 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात सध्या 23 हजार 875 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे विभागात आतापर्यंत एकुण 16 हजार 546 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.55 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.78 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा –
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 4 लाख 34 हजार 601 रुग्णांपैकी 4 लाख 5 हजार 64 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 20 हजार 241 आहेत. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.14 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 93.20 टक्के आहे.

सातारा जिल्हा –
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 60 हजार 549 रुग्णांपैकी 57 हजार 104 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 581 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 864 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा –
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 54 हजार 499 रुग्णांपैकी 51 हजार 264 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 870 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा –
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 48 हजार 900 रुग्णांपैकी 46 हजार 799 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 335 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा –
कोल्हापूर जिल्हयातील कोरोनाबाधित एकूण 50 हजार 859 रुग्णांपैकी 48 हजार 756 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 353 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 446 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 73, सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 181, सांगली जिल्ह्यात 34 तर कोल्हापूर जिल्ह्यात 43 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 917 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 431, सातारा जिल्ह्यामध्ये 363, सोलापूर जिल्हयामध्ये 100, सांगली जिल्ह्यामध्ये 23 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 0 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 43 लाख 15 हजार 504 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 49 हजार 408 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

spot_img
Latest news
Related news