Pune : दिव्यांग विद्यार्थ्यांनी समूहनृत्य स्पर्धेमधून दाखवले आपलेही नृत्यकौशल्य

एमपीसी न्यूज – शिवरायांच्या इतिहासापासून प्रचलित असणारे पोवाडे, भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील विविध प्रेरणादायी गाणी आणि सध्याच्या प्रसिद्ध गाण्यांवर दिव्यांग मुलांनी ठेका धरत आपले नृत्य कौशल्य दाखवले. सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना गाता यावे, नाचता यावे, त्यांना आपल्या सुप्त गुणांना समाजासमोर प्रकट करता यावे त्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना वेस्टच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मतिमंद गटासाठी समूहनृत्य स्पधेचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या करिता लायन्स क्लब तर्फे दरवर्षी या समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्पर्धेत एकूण १६ शाळा व कार्यशाळा सहभागी झाल्या होत्या. अस्मिता ठकार व श्रेया ठकार हे या स्पर्धेचे परीक्षक होते. या कार्यक्रमास मालती भामरे, अभय शास्त्री, डॉ. संजय चोरडीया, प्रतिभा भगत, अल्पेश गुजराथी, योगेश कदम, स्पर्धा प्रमुख सीमा दाबके उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन पल्लवी देशमुख यांनी केले तर आभार मृदूला केळकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.