Pune : सदानंद शेट्टी मित्र परिवारातर्फे आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमाला मान्यवरांची हजेरी

एमपीसी न्यूज – सदानंद शेट्टी मित्र परिवार आणि पद्मकृष्णा फाउंडेशन आयोजित दीपावलीनिमित्त रजनीगंधा मराठी, हिंदी गीत व नृत्याचा कार्यक्रम, दिवाळी फराळ व दीपावली शुभेच्छा समारंभ कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.

कार्यक्रमाला पुण्यनगरीच्या महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या नूतन आमदार मुक्ता टिळक, पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार सुनील कांबळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नेतेमंडळी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी आणि पद्मकृष्णा फाउंडेशनचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सदानंद शेट्टी यांनी पुणे शहर काँगेस वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातुन नुकतेच निवडणून आलेल्या सुनील कांबळे यांच्या विजयात सदानं शेट्टी यांचा मोठा वाटा आहे. कसबा मतदारसंघातही शेट्टी यांची मोठी ताकद आहे. त्याचा मुक्ता टिळक यांना फायदा झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.