Pune Diwali Update : पुणे पोलिसांकडून 12 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर मध्येच फटाके विक्रीला परवानगी

एमपीसी न्यूज – दिवाळी सणानिमित्त (Pune Diwali Update) दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने हे लायसन्स ब्रान्च या कार्यालयाकडून देण्यात येतात. यावर्षी 12 ते 21 ऑक्टोबर या कालावधीतच फटाके विक्री करता येणार आहे. तसेच विक्री करताना व फटाके फोडताना कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये यासाठीची नियमावली पुणे पोलिसांनी जाहीर केली आहे.

1) कागदी स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेमी लांबीचा 3.175 सेमी व्यासाचा दौ-याने गुंडाळलेला अॅटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणा-या फटाक्यांच्या उत्पादनावर जवळ बाळगणा-यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

2) 21 ऑक्टोबर नंतर म्हणजे विक्रीची मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाकेचा साठा हा परवाना असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणा-याकडे परत करणे आवश्यक आहे.

3) पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही (Pune Diwali Update) रस्त्यात किंवा रस्त्यापासून 10 मीटर अंतराचे आत कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निवाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे. यामध्ये महामार्ग / फूल / सेतू मार्गावर नेमलेले मार्ग सेतु कमानवजा घाट धक्का किंवा कोणतीही आळी किंवा वाट मग रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

4) सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध आहेत. त्यानुसार एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणा या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे.

अ) जर साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उठविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत असावी. यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.

PCMC News: लेखापरीक्षण मोजमाप पुस्तकात खाडाखोड

ब) ध्वनी निर्माण करून आवाजाचे प्रदूषण करणा-या फटाक्यांवर रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. परंतु, जे फटाके विविध रंग निर्माण करतात किंवा सोडतात किंवा आवाज करत नाहीत अशा फटाक्यांवर निर्बंध नाहीत.

तसेच, शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता प्रभागामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालचे 100 मीटरपर्यंत क्षेत्र येते.

5) परवानाधारक विक्रेत्यांनी विदेशी मूळ फटाके विक्री करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.

6) ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी 50 मीटरच्या परिसरात संयुक्त नियंत्रक, विस्फोटके, फटाक्यांची आतिषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

तरी वरील नियमाचे काटेकोरपणे पालन करून कोणताही (Pune Diwali Update) अपघात अथवा धोका होणार नाही याबाबत कृपया नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहान पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.