Pune : नुसतं नोकऱ्यांच्या मागे लागू नका, स्वतःमधील हुन्नर शोधा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्याच्या मागे लागू नका. स्वतःमधील हुन्नर शोध आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका. अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हडपसर येथील मनसे नोकरी महोत्सवामध्ये उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले.

हडपसर येथील बंटर स्कूल येथे पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनी मनसे नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलत होते. यावेळी माजी गटनेते बाबू वागस्कर, माजी नगरसेविका रूपाली पाटील तसेच आजी- माजी पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

  • यावेळी राज ठाकरे म्हणाले, काही दिवसापुर्वी नापासांचे प्रगती पुस्तक हे वाचले असून यात अनेक व्यक्तीबाबत माहिती मिळण्यास मदत झाली. त्यामध्ये शिक्षणात जरी मागे राहिले. तरी कोणी पंतप्रधान, उद्योजक झाल्याचे वाचण्यास मिळाले. त्यामुळे तरुणांनी एक लक्षात ठेवावे की पास, नापास होणे. याचा आयुष्यशी काही संबध नसतो. त्यामुळे प्रत्येकाने एक लक्षात ठेवा की नुसत्याच नोकराच्या मागे न लागता. एका ठिकाणी शांत बसून स्वतः मधील हुन्नर शोधा आणि त्याप्रमाणे काम करा.

बालपणातील आठवणीला उजाळा देत ते पुढे म्हणाले की, मी लहान असताना दादर येथील एक वडापाव खाण्यास जात असे त्या दुकानावर काही दिवसांनी आयकर विभागाने छापा टाकला. त्यामुळे त्या विक्रेत्याची कमाई किती असेल पण, या विक्रेत्याने स्वतः मधील टॅलेंट ओळखल्यामुळे व्यवसायामध्ये यशस्वी झाला आहे. तरुणांनी स्वतःमधील टॅलेंट वेस्ट करू नका. स्वतः ला सिद्ध करा अशा शब्दात त्यांनी उपस्थित तरुणाईला मार्गदर्शन केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like