Pune : हेल्मेट हवे का नको ? पतित पावन संघटनेने पुणेकरांचे घेतले मतदान

माॅडर्न महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मतपेटीच्या माध्यमातून मते घेतली

एमपीसी न्यूज – पुणे शहरात 1 जानेवारी 2019 पासून वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीच्या निर्णया विरोधात शहरातील विविध सामाजिक संघटनाकडून पोलीस आयुक्त कार्यालयांवर मोर्चाकडून निषेध देखील नोंदवला. त्या पार्श्‍वभूमीवर आज (सोमवार) पुण्यातील शिवाजीनगर येथील माॅडर्न महाविद्यालयात पतीत पावन संघटनेच्या वतीने हेल्मेट हवे का नको? या विषयावर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मतपेटीच्या माध्यमातून मते घेण्यात आले.

यावेळी पतीत पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर म्हणाले की, पुणे शहरात चुकीच्या पद्धतीने हेल्मेट सक्ती पोलिस विभागाकडून राबविण्यात येत आहे. आमचा हेल्मेटला विरोध नाही. मात्र सक्तीला विरोध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आज आम्ही विद्यार्थी वर्गाकडून हेल्मेट सक्ती बाबत मते जाणून घेतली आहे. शहरातील विविध महाविद्यालयामध्ये जाऊन मते घेणार आहोत. लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांची भेट घेऊन विद्यार्थी वर्गाने नोंदविलेली मते त्यांच्या पर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.