Pune : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी जास्त पैसे मोजण्याची गरज काय ? : मनसे

Do patients with coronary artery disease need to pay more for treatment? : MNS

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी जास्त पैसे मोजण्याची गरज काय, असा सवाल मनसेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

शहरातील हॉस्पिटलमधील जास्तीत जास्त बेड ( ८० % पर्यंत ) कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्या संदर्भातील महापालिका प्रशासनाने आदेश दिले आहेत.

यामुळेच पुणे शहरातील दीनानाथ, भारती, सिम्बॉयसिस सारख्या हॉस्पिटलनी मोठ्या प्रमाणात, तर इतर धर्मदाय रुग्णालयांनी काही प्रमाणात कोरोना रुग्णांवर उपचार करायला सुरवात केली आहे.

दि. २३ मे २०२० ला महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचाराची परिपूर्ती संबंधित हॉस्पिटलला करण्याचा निर्णय घेतला. असे असताना पुणे शहरातील हॉस्पिटलनी दोन रुग्णाच्यामध्ये रिक्त ठेवण्यात येणाऱ्या बेडसाठी भाड्याची मागणी केली आहे.

पुणे मनपाने देखील त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन घेतला आहे. त्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागानेदेखील भूमिका मांडली आहे.

यामध्ये नव्याने हॉस्पिटलने मागणी करणे अयोग्य व नीतिमत्तेला धरून नाही, असे मनसेचे शहाराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

सरकारकडे रिक्त बेडचे भाडे मागत असेल आणि निर्बुद्ध पणे अधिकारी हेतुतः त्या मागणीला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू पहात असतील तर त्यांचे हेतू तपासून त्यांच्या विरोधात गैरव्यवहारासाठी प्रयत्न करण्याचा ठपका ठेवत कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.