Pune : ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाचा 3 दिवसात 292 नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज – राधाकृष्ण नगर, सेनापती बापट रोड येथे आयोजित केलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाचा 3 दिवसात 292 नागरिकांनी लाभ घेतला आहे.

हा उपक्रम श्री सेवा मित्र मंडळ, राधाकृष्ण मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ दुर्गानगर, भारतीय जैन संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या शिबिरात सर्व सोसायट्याचे चेअरमन, सेक्रेटरी व मंडळाचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

आरोग्य तपासणी दरम्यान 3 दिवसांत 292 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी उपक्रमासाठी शासनाच्या सुचना व आरोग्य विभागाच्या निकषांचे पालन करण्यात आले.

या शिबिरात डॉ. प्रदिर वायचाळ व स्टाफ यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार व मार्गदर्शन केले. भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी व सचिन मेंगाळे यांनी या उपक्रमासाठी सक्रिय योगदान दिले.

आरोग्य तपासणी यशस्वी करण्यासाठी महेश काळे, विजय पाबळे, विजय पवार, अर्जुन भोगाडे, प्रवीण पाटील, रविंद्र गुजर, सुनील सोनवणे, बाळासाहेब मासाळ, रविंद्र शिंदे, किरण राखुंडे, गुजराथी, सुनील सोनवणे, डीबी कदम, बीएन श्रोती आदी प्रमुख सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.