Pune : सर्दी, खोकला, तापावरील औषधांसाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक

एमपीसी न्यूज – कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना चालू केल्या असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्दी, खोकला, तापावरील औषधे यापुढे मिळणार नाहीत.

सर्दी, खोकला, तापावरील औषधे घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक विनाप्रिस्क्रिप्शन औषधे औषधांच्या दुकानातून घेतात. परंतु अशा आजारातच एखाद्याला कोरोनाची लागण झाला असण्याची दाट शक्यता असते किंवा ते कोरोनाचे वाहक असतात.

याकारणाने औषध दुकानदारांनी सर्दी, खोकला, ताप यासाठी औषधे नेण्यास येणाऱ्यांना प्रथम वैद्यकीय सल्ला आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन येण्यास सांगावे आणि त्या प्रिस्क्रिप्शननुसारच औषधांची विक्री करावी.

अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ला किंवा प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधे दिल्याचे आढळल्यास त्या दुकानदारांवरच सक्त कारवाई करण्यात येईल, असे आदेश राज्याचे अन्न, औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त एस.बी.पाटील यांनी दिले आहेत. हे आदेश पुणे जिल्हा आणि पुणे विभागातील किरकोळ औषध विक्रेत्यांना लागू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.