Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने केली जबरी चोरी; 83 हजारांचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज : मोलकरीन महिलेनेच दागिन्यांवर डल्ला मारत 83 हजारांचा ऐवज (Pune) चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून मोलकरीन महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार 24 मार्च रोजी घडला आहे. तक्रारदार यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून संबंधित महिला घर कामासाठी येत होती. तिला घरातील सर्व माहिती होती.

दरम्यान, तिने तक्रारदार यांची नजर चुकवून व त्यांच्या न कळत बेडरूममध्ये घुसून कपाटातील 83 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.

Pune : विवाहित तरुणासोबत प्रेमप्रकरण; लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

ज्वेलरी बॉक्स (Pune) उघडून तिने चोरी करून नेली. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. दरम्यान, पसार झालेल्या मोलकरीन महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस अंमलदार एस. एस. खामगळ हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.