Pune : ‘कोरोना’ विषाणूला घाबरू नका, हिंमतीने लढा -रुबल अगरवाल

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक लढा देण्याकरिता सर्वांनी मिळून हिंमतीने लढा द्या, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, असे आवाहन पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी केले आहे.

पुणे मनपाच्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस यांना रुबल अगरवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. आरोग्यप्रमुख यांच्या कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी मनपाच्या विविध रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांना मार्गदर्शन केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक लढाई आपण जिंकणारच आहोत. महापालिकेच्याया रुग्णालयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रतिबंधकरिता करण्यात येत असलेले उपचार व एकूणच उत्तम कार्यपद्धतीबाबत अनेकांनी प्रशंसा केलेली आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

सध्या या रुग्णालयात उपचार व सहकार्य व सहभाग घेण्याकरिता सामाजिक भावनेतून अनेक डॉक्टर्स आपल्या मदतीला पुढे येत आहेत. आवश्यक मनुष्यबळ व सामुग्री बाबत काळजी करू नये, उपचार करताना औषधे अथवा सामुग्रीबाबत अडचण आल्यास अशा वेळी मध्यवर्ती औषध भांडार कडून उपलब्धता करून घ्यावी. तिथेही उपलब्ध नसल्यास तातडीने खरेदी करावी, अशाप्रसंगी तातडीच्या खरेदीकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

याप्रसंगी विविध रुग्णालयातील प्रश्न व अन्य माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे. डॉ. संजीव वावरे, डॉ. वैशाली जाधव, डॉ. कल्पना बलिवंत, डॉ. सूर्यकांत देवकर व अन्य अधिकारी उपस्तित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.