Pune : अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक धरणे भरून वाहत आहेत. शहर, गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता आपत्तीजन्य परिस्थितीत पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राज्यभरासह पुणे व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नद्या, नाले तसेच धरणे तुडुंब भरली आहेत. सोशल मिडीयवर सध्या धरण फुटले, नदीला पूर आला, पूल पडले, रस्ते खचले आणि अन्य बाबतीत अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होत आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • नागरिकांनी या फेक मेसजवर विश्वास ठेऊ नये. आवश्यक माहिती तसेच खात्रीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाशी (020 26126296) संपर्क करण्याचे आवाहन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.