Pune : पुणेकरांनो, मुबलक भाजीपाला मार्केट यार्डमध्ये गर्दी करू नका -बी. जे. देशमुख

एमपीसी न्यूज – पुणेकरांना मुबलक भाजीपाला उपलब्ध आहे. मार्केट यार्डमध्ये होलसेल विक्री होते. किरकोळ विक्री होत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले.

मार्केट यार्डमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या एक दिवस भाजीपाला, तर एक दिवस फळे विकली जात आहेत. हे मार्केट यार्ड सुरू असल्याने शेतकऱ्यांचा माल विकला जात आहे. विनाकारण गर्दी वाढली तर हे मार्केटयार्ड बंद करावे लगेल, अशी भीतीही देशमुख यांनी व्यक्त केली.

आज बाजारात 550 गाड्यांची आवक झाली. कांदा, लसूण, फळे आली आहेत. पोलीस, सर्व कर्मचारी इमानेइतबारे काम करीत आहेत. अडते, शेतकरी यांना लोकांनी सहकार्य करा, प्रशासन सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.