Pune : ‘अनोळखी वस्तूला हात लावू नका !’

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ के वेंकटेशम यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान या दोन देशामध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही संशयित वस्तू दिसल्यास पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवा.तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून नागरिकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ के वेंकटेशम यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.