Pune : लॉकडाऊनच्या काळातील निविदांच्या हेतूंबद्दल शंका – विजय कुंभार

एमपीसीन्यूज  – लॉकडाऊनच्या काळात पुणे महापालिकेने ७१ निविदा काढल्या आहेत. आपत्तीच्या काळात हा निविदा मागविण्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण करणारा आहे, असा आरोप सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे.

सुशोभीकरण,  फुटपाथची दैनंदिन दुरुस्ती, रस्त्याचे रिसर्फेसिंग व देखभाल-दुरुस्ती, बायोगॅस प्लांटची देखभाल-दुरुस्ती अशा निविदा आपत्तीच्या काळात काढणे आवश्यक नाही. त्यामुळे त्या संशयास्पद आहेत.

महापालिकेने काही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्या निविदांनुसार पालिकेला साबणाच्या तीन लाख वड्या, दोन लाख सुती वॉशेबल मास्क आणि डिटर्जंट पावडर आदी खरेदी करायचे आहे. या वस्तू कोणत्या ब्रँडच्या असाव्यात त्याचाही उल्लेख निविदेत आहे. एखाद्या ब्रँडचे नांव निविदेत देता येते का? असले प्रश्न विचारायचे नाहीत ! शेवटी ही खरेदी आपत्ती काळातील आहे ! असा उपहासात्मक टोलाही कुंभार यांनी दिला आहे.

त्याचप्रमाणे पीपीई कीट, एन ९५ मास्क आणि इंन्फ्रारेड थर्मामीटर खरेदी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ७५ लाख रुपयांच्या या निविदेत किती वस्तू येणार याचा उल्लेख नसल्याचेही कुंभार यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.