Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समाज परिवर्तनाचे विचार; डॉ. दत्तात्रय गायकवाड यांचे प्रतिपादन

एमपीसी न्यूज – समाज परिवर्तनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अतिशय महत्वाचे आहेत. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडवता व हिंसेला कुठेही स्थान न देता हजारो वर्षांची गुलामगिरी संपुष्टात आणली. माणूस म्हणून जगण्यासाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा मूलभूत अधिकार राज्यघटनेतून प्रत्येक भारतीयाला दिला आहे असे प्रतिपादन केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान संशोधनाचे सेवानिवृत्त संचालक व ज्येष्ठ वक्ते डॉ. दत्तात्रय गायकवाड (Pune) यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महावितरण व महापारेषणमधील उत्सव समितीच्या वतीने रास्तापेठ येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. दत्तात्रय गायकवाड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे (Pune) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड, महाव्यवस्थापक राजेंद्र गायकवाड (महापारेषण, मुंबई), अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले व विठ्ठल भूजबळ यांची उपस्थिती होती. यावेळी पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्राचे अभ्यासक व तज्ज्ञ म्हणून देश उभारणीत दिलेल्या ऐतिहासिक योगदानाची माहिती दिली.

Pimpri : महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध चित्रकार सिद्धार्थ धिवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. दत्तात्रय गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर चिंतन: आशय एवं विमर्श’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवलिंग बोरे यांनी केले तर बाबासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी सर्व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त उत्सव समितीने पुढाकार घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.