Pune : डॉ.कबीर उमाकुमार यांना रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स लंडन तर्फे एफ.आर.सी.एस. पदवी

एमपीसी न्यूज- डॉ.कबीर उमाकुमार यांना लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सची आंतरराष्ट्रीय ख्यातीची एफ.आर.सी.एस. पदवी मिळाली आहे. त्यांना रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सचे फॅकल्टी म्हणून सदस्यत्वही मिळाले आहे.

ह्रदयशस्त्रक्रिया चिकित्सक असणारे डॉ.कबीर उमाकुमार हे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या हृदयशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी नॅशनल हेल्थ सर्वीस ( लिव्हरपूल ) मध्ये रॉयल कॉलेजच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष काम केले आहे.

डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ.उर्मिला सप्तर्षी यांचे चिरंजीव असणाऱ्या डॉ.कबीर उमाकुमार यांनी 10 वर्षात हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया केल्या आहे. ह्रदयाला कमीत छेद घेऊन झडप बदलीची शस्त्रक्रिया करण्यातील ते तज्ज्ञ आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.