Pune : डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे अपघाती निधन

एमपीसी न्यूज- संचेती हॉस्पिटलचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख व जेष्ठ विधीज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचा मुलगा डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय 44) यांचे तळेगाव जवळ अपघाती निधन झाले. रविवारी रात्री 11 वाजता द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या लेनवर हा अपघात झाला. गाडीचे टायर पंक्चर झाले म्हणून ते ड्रायव्हरला मदत करत असताना वोल्वो बसने दोघांना उडवले. यामध्ये डॉ. केतन खुर्जेकर व ज्ञानेश्वर विलास भोसले हे चालक जागीच ठार झाले.

या अपघातात जयेश बाळासाहेब पवार व प्रमोद भिल्लारे हे दोघे निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले. मुंबईला मेडिकल काॅन्फरन्ससाठी गेले होते. परत येत असताना हा अपघात झाला. डॉ. केतन खुर्जेकर यांचा आज वाढदिवस होता अशी माहिती पुढे आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.