Pune : हा फक्त पुरस्कार नसून माझ्या कार्याचा गौरव आहे : मेजर डॉ विपुल पाटील  

मेजर डॉ. विपुल पाटील यांचा 'कोथरूड भूषण' पुरस्कार 2019 ने गौरव 

एमपीसी न्यूज- ‘कोथरूड भूषण पुरस्कार दिल्याबद्दल आणि माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल मी कोथरूड वासियांचे आणि ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे आभारी आहे. हा फक्त पुरस्कार नसून माझ्या कार्याचा गौरव आहे. सैन्यात कार्य करण्याची  प्रेरणा मला कोथरूड मधूनच मिळाली. हा पुरस्कार त्या प्रत्येक कोथरूड वासियांचा आहे ज्यांच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम आहे, असे ब्लॅक कॅट कमान्डो (एनएसजी) मेजर डॉ विपुल पाटील बोलत होते. 

निमित्त होते ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ च्या वतीने ‘कोथरूड भूषण पुरस्कार 2019 प्रदान सोहळ्याचे. झी मराठी वरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील हास्यसम्राट आणि सिने कलाकार भाऊ कदम यांच्या हस्ते मेजर विपुल पाटील यांना गौरविण्यात आले. शनिवारी दहीहंडी उत्सवात हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. पुणेरी पगडी, शाल, आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या प्रसंगी ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के, अध्यक्ष गिरीश गुरनानी, राहुल कदम, ट्रस्ट चे पदाधिकारी उपस्थित होते.  ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट फक्त पारंपरिक कार्य करत नसून सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. ट्रस्ट चा नेहमीच सामाजिक कार्यात उल्लेखनीय सहभाग असतो’, असेही मेजर विपुल पाटील म्हणाले.

मेजर डॉ विपुल पाटील हे ब्लॅक कॅट कमान्डो, स्क्रॉड्रन कमांडर एनएसजी आहेत. जम्मू -काश्मीर मध्ये सीमेवर अनेक यशस्वी ऑपरेशन मध्ये सहभाग घेतलेले मेजर विपुल पाटील कोथरूड रहिवासी आहेत, अशी माहिती’अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

कार्यक्रमाचे यंदाचे 8 वे वर्ष होते. ‘बढेकर ग्रुप’, ‘वेंकीज’ आणि ‘गोयल गंगा ग्रुप’ हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते.  कोथरूडमधील कला, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या गुणवंताना ट्रस्टच्या वतीने ‘कोथरूडभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.

कोथरूड भूषण पुरस्काराचे पुरस्कारार्थी मेजर डॉ विपुल पाटील यांनी युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक सुवर्णपदक मिळविले आहे. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एन डी ए, ए एफ एम सी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रशिक्षक आहेत. जगातील सर्वात उंच व खडतर युघक्षेत्र -सियाचीन येथे त्यांनी कार्य केले. आंतरराष्ट्रीय  अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे संस्थापक राहुल म्हस्के आणि अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.