Pune : डॉ. मृणाल बचुटे-केत यांची युरोप अभ्यास दौऱ्यासाठी निवड

एमपीसी न्यूज- पुणे येथील सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या चिंचवड येथील डॉ. मृणाल बचुटे-केत यांची युरोपियन विद्यापीठासोबत शैक्षणिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

युरोपातील स्वित्झर्लंड आणि जर्मनी या देशातील नामवंत विद्यापीठांना त्या भेटी देणार आहेत. तसेच बीएसएफ, मर्सिडीज बेंज सारख्या प्रतिष्ठित कंपन्यांना भेटी देऊन अद्यायावत तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांसोबत घेणार आहेत. या परदेश दौऱ्यासाठी बचुटे व केत कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.