Pune : डॉ. नायडू रुग्णालयास हवा शुद्ध आणि निर्जंतुकीकरणसाठी मशिन भेट

एमपीसी न्यूज – डॉ. नायडू रुग्णालयास ” Scitech Airon Generator” मशिन भेट देण्यात आल्या. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयातील वॉर्डमधील हवा शुद्ध राहण्याकरिता, विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने एयर फिल्टरच्या सहाय्याने वॉर्ड शुद्ध व निर्जंतुकीकरण रहावा, याकरिता 4 मशिन डॉ, नायडू रुग्णालयास भेट देण्यात आल्या.

मुकुल माधव फौंडेशनचे प्रतिनिधी बबलू मोकाले म्हणाले, साधारणपणे १००० चौ. फूट. क्षेत्रफळ वॉर्डमधील हवा शुद्ध व निर्जंतुक राहण्याकरिता एक मशिनचा वापर होईल, याप्रमाणे ४००० चौ. फूट. क्षेत्राकरिता चार मशिनचा उपयुक्त वापर होईल.

सायन्स अँड टेकनोलॉजी पार्क यांच्या पुढाकाराने फिनॉलेक्स पाईप व त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फौंडेशन यांच्या अर्थ सहाय्याने या मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like