Pune : साहित्यिक कलावंत संमेलन अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज – 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रामचंद्र देखणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या निवडीचे पत्र विरोधी पक्षनेते दिलीप बराटे व साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे यांनी देखणे यांना दिले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित 19 वे साहित्यिक कलावंत संमेलन 28 व 29 डिसेंबर 2019 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे होणार आहे.

संत साहित्य, लोक साहित्य आणि ललित साहित्यात तुम्ही केलेले लेखन आणि संशोधन निश्चितच वंदनीय आहे. मराठी साहित्य क्षेत्रात डॉ. देखणे यांचे योगदान श्रेष्ठ आहे. 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठानने तुमची निवड केलेली आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची परंपरा खूप मोठी आहे. आपल्या निवडीने ही परंपरा अधिक समृद्ध होईल, असे देखणे यांना दिलेल्या पत्रात साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि. दा. पिंगळे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.