Pune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा 2020 प्रशिक्षण वर्गाचे डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘डॉ.पी. ए. इनामदार आयएएस अॅकॅडमी’च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आज, शनिवारी सकाळी झाले. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी रमेश रुणवाल, वैभव सणस उपस्थित होते. अॅकॅडमीचे संचालक प्रशांत चव्हाण यांनी स्वागत केले.

डॉ. शिसवे म्हणाले, “युपीएससी परीक्षेची तयारी करताना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. मनावर ताण घेऊ नका. या तयारीबाबत अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले आहेत, ते दूर करणे महत्वाचे आहे.आपल्याला ज्या करीयर मध्ये आनंद वाटेल, तेच निवडा. कोणीतरी लोकसेवा आयोग परीक्षा तयारी करीत आहे, म्हणून आपणही ते करीयर करूया, असे वाटणे योग्य नाही. मात्र, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चांगल्या सेवेच्या संधी मिळतात. पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. समाजमान्यता मिळवणे हे आपले ध्येय असले पाहिजे. स्पर्धा परीक्षेत मोठी स्पर्धा असते. स्पर्धा सर्वच क्षेत्रात असते, या स्पर्धेत उतरून यशस्वी होण्याचा आनंद वेगळाच असतो. सकारात्मक मानसिकतेने आपण स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उतरले पाहिजे. जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत”

अॅकॅडमीतील प्रशिक्षकांचा यावेळी डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1