BNR-HDR-TOP-Mobile

Pune : राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज- ‘राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल’ पुणेच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याबरोबर 2018 सालच्या कार्यकारिणीचीही फेरनियुक्ती करण्यात आली. सोमवारी (दि.10) पार पडलेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली.

या बैठकीला डाॅ.सुनील जगताप, डाॅ. सुनील होनराव, डाॅ. हेमंत तुसे, डाॅ. अजितसिंह पाटील, डाॅ सिध्दार्थ जाधव, डाॅ. राहुल सूर्यवंशी, डाॅ. तुषार वाघ, डाॅ. नितीन पाटील, डाॅ. राजेंद्र जगताप, डाॅ शशिकांत कदम, डाॅ. बरगाळे, डाॅ. प्रताप ठुबे, डाॅ परशुराम सूर्यवंशी, डाॅ. गणेश निंबाळकर, डाॅ. रवींद्र सुतार, डाॅ. सुनील धुमाळ उपस्थित होते.

डॉक्टर डे च्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंधातून निवडून आल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

.