Pune : वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीवर दारू पिण्याचा कार्यक्रम जोरात; कारवाई करण्याची कैलास दांगट यांची मागणी

एमपीसी न्यूज – लाखो नागरिकांना ज्या वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीवरून पाणीपुरवठा होतो. त्या ठिकाणी दररोज रात्री काहीजण बिनधास्तपणे दारू पीत आहेत. त्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. या दारूड्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जनहित कक्ष मनसे पुणे शहर अध्यक्ष तथा जनसेवक कैलास दांगट यांनी केली आहे.

तिरुपतीनगर गेटसमोर वारजे जलशुध्दिकरण केंन्द्रावर दररोज रात्री काहीजण पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर दारू पीत बसतात. याबाबत मला तिरुपतीनगर सोसायटीच्या काही लोकांनी माहिती दिली. या भागांत अनेक छोट्या मोठ्या सोसायट्या आहेत.

या वारजे जलशुद्धीकरण केंद्रावरून पुण्याच्या संपूर्ण पश्चिम भागाला पाणीपुरवठा केला जातो. वारजे – माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, बाणेर – बालेवाडी भागांतील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा होतो.

या दरोड्यांनी पाण्याच्या टाकीत एखादा पदार्थ टाकला तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने दाखल घेऊन या दारूड्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कैलास दांगट यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.