Pune: वाहनचालकाचा मुलगा झाला पीएसआय

सूरज जगतापचे पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत यश; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये घेतलेल्या परीक्षेत 33 व्या रँकने उत्तीर्ण

एमपीसी न्यूज – घरची हलाखीची परिस्थिती, वडील राज्य राखीव पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या मोटारीवर वाहनचालक असल्याची खंत मनात होती. त्यातूनच मनाशी पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून स्पर्धा परिक्षेला अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात सूरज सुधाकर जगताप या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाला गवसणी घातली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2017 मध्ये घेतलेल्या परीक्षेत हडसपर परिसरात राहणा-या सुरज सुधाकर जगताप याने पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. 33 व्या रँकने उत्तीर्ण होऊन सुरज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे. स्पर्धा परिक्षेबाबत सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. सूरज याचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहातून झाले. तर, अकरा आणि बारावी अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून झाली. तर, नाशिकमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण केले.

  • त्यानंतर काहीकाळ त्याने नोकरी केली. नोकरी करत असताना मोठा भाऊ आणि मित्र पोलीस उपनिरिक्षक झाला होता. वडील राज्य राखीव पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या मोटारीवर वाहनचालक असल्याची खंत मनात होती. त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. त्यानुसार सुरज याने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी घातली.

यशाबाबत बोलताना सूरज जगताप म्हणाला, ”घरची परिस्थिती हलाखीची होती. अंत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आई-वडिलांनी आम्हाला शिकविले. वडील राज्य राखीव पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांच्या मोटारीवर वाहनचालक होते. ते सेवानिवृत्त झाले आहे. परंतु, वडील वाहनचालक असल्याची खंत मनात होती. त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले होते”.

”त्यादृष्टीने अभ्यास करुन पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. याचा आनंद होत आहे. एका वाहनचालकाची दोनी मुले पोलीस अधिकारी झाल्याने वडिलांच्या चेह-यावर देखील आनंद आहे. मोठा भाऊ सचिन जगताप सन 2011 मध्ये पोलीस उपनिरीक्षक झाला. त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. गडचिरोलीत कार्यरत आहे. आम्ही दोघा भावांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चिज केले. या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी सनदी अधिकारी संकेत भोंडवे, युवराज वाकडकर, राजेश कवडे, निलेश कवडे यांनी मार्गदर्शन केले. आधार दिल्याचे” सूरज याने आवर्जुन सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.