Pune : संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर आता ड्रोनद्वारे नजर – पुणे पोलिसांचा निर्णय

एमपीसी न्यूज ; कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक रस्त्यांवर येऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, तरीही काही नागरिक रस्त्यावर येत असल्याचे पाहायला मिळते. अशा विनाकारण रस्त्यांवर फिरणार्‍या नागरिकांवर नजर ठेवणेही पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामुळे आता संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यावर ड्रोनमार्फत नजर ठेवण्याच्या निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी ही माहिती दिली. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस वारंवार करीत आहेत. वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडण्याचे थांबत नसल्याने पोलिसांनी आता ड्रोनच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. यामुळे पोलिसांचा ताण कमी होण्याबरोबरच संसर्गाचा धोकाही टळणार आहे.

याशिवाय पोलिसांनासुद्धा अशा घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी नागरिकांनी शासनाने घातलेल्या अटींचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.