Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणात थेट लंडन कनेक्शन; एमडी ड्रग्जची कुरकुंभमध्ये निर्मिती, सेवन लंडनमध्ये!

एमपीसी न्यूज :  पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात (Pune Drugs News) मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून एफडीए, एमआयडीसीसोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून कुरकुंभ येथील कंपनीवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांनी या पत्रात केल्या आहेत. तिन्ही विभागांना तेथे कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कुरकुंभ येथील मेफेड्रॉन निर्मिती करणार्‍या अर्थ केम लॅबोरटरीज् कंपनीच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न औषध प्रशासनाबरोबर पत्र व्यवहार केला आहे. 

इतर केमीकल उत्पादनाच्या नावाखाली येथे अमली पदार्थ तयार करण्याचे उद्योग सुरू होते.  यापुर्वी देखील कुरकूंभ औद्योगिक वसाहतीत दोन कंपन्यामध्ये अमली पदार्थ तयार केले जात असल्याचे पुढे आले होते. त्यानंतर देखील औद्योगिक विकास महामंडळ, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि एफडीए यांच्यामध्ये हा प्रकार निदर्शनास कसा आला नाही, हा देखील एक मोठा सवाल निर्माण झाला आहे.

Wakad : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक

पोलिसांनी अर्थ केम लॅबोरटरीज् ही कंपनी सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच एम डी ड्रग्जची कुरकुंभमध्ये निर्मिती होत असली मात्र त्याचे सेवन थेट लंडनमध्ये होत होते. त्यामुळे या गुन्ह्यात खूप मोठी साखळी असल्याची शंका पोलिसानी व्यक्त केली आहे. ‘रेडी टू ईट’ फूड पाकिटांच्या माध्यमातून एम डी ड्रग्स थेट लंडनमध्ये पोहचले. कुरकुंभ एमआयडीसी मधील कारखान्यातील मुद्देमाल दिल्लीत (Pune Drugs News) आणि तिथून लंडनला कुरिअर करण्यात आला.

दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या तीन जणांवर ड्रग्ज लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती. तर भुटीया आणि कुमार हे दोघेही फूड कुरिअरचा व्यवसाय करत होते. आत्तापर्यंत दिल्लीतून लंडनमध्ये 4 पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे ड्रग्ज प्रकरणात थेट लंडनचे कनेक्शन समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.