Pune: माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर मद्यपींचा हल्ला

Pune: drunk youth attacked on Former MLA Medha Kulkarni in kothrud

एमपीसी न्यूज- कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर मद्यपींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास (दि.6) घडली.

मद्यपींनी केलेल्या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला व बोटांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

काही तरुण शनिवारी सायंकाळी सहजानंद सोसायटीच्या बाहेर दारू पीत बसले होते. तक्रारदार महिलेचे सासरे तिथून फेरफटका मारत होते. नशेत असलेल्या या तरुणांनी त्या गृहस्थांना हटकले आणि बाचाबाची सुरू केली.

_MPC_DIR_MPU_II

या तरुणांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बाटली फेकून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून दोन तरुण धावत आले. त्यांनाही चौघा दारूड्या तरुणांनी मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी तक्रारदार महिला पुढे आल्या असता त्यांनाही ढकलून देण्यात आले.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना हा प्रकार समजला असता त्याही तिथे पोहोचल्या. नशेत असलेले तरुण ऐकून घेण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी धक्काबुक्की केली. या हल्ल्यात मेधा कुलकर्णी यांच्या हाताला व बोटांना दुखापत झाली आहे.

कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी अमर बनसोडे, विनोद गंदे, तेजस कांबळे आणि मिथुन हरगुडे यांच्यावर मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like