Pune : पैसे परत मिळण्याची आशा नसल्याने डीएसके ठेवीदाराची आत्महत्या

एमपीसी न्यूज- अनेक वेळा पाठपुरावा करूनही गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका डीएसके ठेवीदाराने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. 

तानाजी गणपत कोरके (वय 60 रा. भीमनगर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. कोरके यांनी मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक म्हणून ‘डीएसके’कडे पैसे गुंतवले होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरके यांच्या पश्चात चार मुली असून त्यापैकी दोन मुलींचा विवाह झाला होता. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कोरके यांनी म्हटले आहे की, 2014 मध्ये दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावाने चार लाख रुपये तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावाने पन्नास हजार रुपयांची रक्कम डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवणूक केली होती.

2017 मध्ये मुदत संपल्यावर रकमेसाठी त्यांनी डीएसके डेव्हलपर्सकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र पैसे मिळू शकले नाहीत. तिसऱ्या मुलीचे लग्न नातेवाइकांकडून उसने पैसे घेऊन केले. मात्र चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे ही चिंता त्यांना सतावत होती. त्या चिंतेमधून आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

‘माझ्या आत्महत्येस डी एस कुलकर्णी यांना जबाबदार धरून पोलीस खात्याने किमान माझ्या कुटुंबियांना तरी पैसे मिळवून द्यावेत. डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरून पोलीस खात्याने किमान माझ्या कुटुंबियांना तरी पैसे मिळवून द्यावेत तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल अशी विनंती त्यांनी पत्रामध्ये केलेली आहे. आपले पैसे परत मिळावेत अन्यथा माझ्या कुटुंबियांवर देखील ही वेळ येऊ शकते. अशी सरकारला विनंती करत आपल्या नावापुढे ‘पुण्यातील सुरुवातीपासूनचा शिवसैनिक.. जय महाराष्ट्र!’असा उल्लेख पत्राच्या शेवटी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.