Pune : डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेच्या पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात धायरीत 12, पिरंगुट 5, बाणेर तीन, बालेवाडी बावधन प्रत्येक 2 मालमत्तांचा समावेश आहे. तसेच यामध्ये 35 एकर जमिनीचाही समावेश आहे. या सर्व मालमतांची माहिती उपजिल्हाधिकारी यांना दिली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएस कुलकर्णी यांच्यासह 8 जण अटकेत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

  • याप्रकरणात 33 हजार गुंतवणूकदारांची 2 हजार 91 कोटींची फसवणूक झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार डीएसकेच्या आतापर्यंत 459 मालमता जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तेची लिलावाची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.