Pune : डीएसकेच्या भावालाही सुनावली पोलीस कोठडी; मुंबईतून काल अमेरिकेत पळून जाण्याचा केला प्रयत्न

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या डी. एस. कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी याला आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे कोर्टात सुनावणी होऊन 17 ऑगस्टपर्यंत मकरंद कुलकर्णीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती. कुलकर्णीला मंगळवारी मुंबई विमानतळावर अटक कऱण्यात आली.

डीएसके घोटाळाप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना अमेरिकेस पळून जात असताना मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिस मुंबईला रवाना झाले होते.

  • त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस असल्याने विमानतळ कर्मचाऱयांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मेहुणी, जावई आणि डीएसकेचे काही सहकारी तुरुंगात आहेत.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसकेच्या अगोदर पुण्यातील आणखी साडेतीनशे कोटींच्या 25 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.