Pune : ढगाळ वातावरणामुळे पुण्यात गारवा आणि हलकासा पाऊस

Due to cloudy weather, sleet and light rain in Pune

एमपीसी न्यूज – आज (सोमवारी) सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने दुचाकी घसरल्या. त्यामध्ये काही नागरिकांना दुखापत झाली. वारजे – माळवाडी, शिवणे, कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर, डेक्कन, कात्रज, स्वारगेट, शहराच्या पेठांमध्ये दुपारी हलकासा पाऊस झाला.

पाऊस सुरु होण्यापूर्वी सोसाट्याचा जोरात वारा असल्याने गारवा निर्माण झाला होता. केरळ किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे. त्यामुळे पुण्यात पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाचा संकट काळात पुणेकर आधीच घरात बसून आहेत. त्यात आज सकाळपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले. त्यामुळे जून महिन्याचा पहिलाच दिवस गारेगार झाला आहे. सोबतीला गार वाराही सुटला आहे. आभाळ भरून आल्याने पुणेकरांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला.

आज झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते निसरडे झाले होते. बच्चे कंपनीसह उत्साही पुणेकरांनीही या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. त्यामुळे ज्या भागांत कोरोना नाही त्या ठिकाणी काही काळ नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.

रविवारीही शहराच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण, गारवा, सोसाट्याचा वारा, पावसाने हजेरी लावल्याने विचित्र वातावरण पुणेकरांना अनुभवायला मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.