Pune : अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारीही सुट्टी

एमपीसी न्यूज – पुणे जिह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी (दि. 6) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळवार (दि. 6) पर्यंत गोवा व महाराष्ट्रात प्रादेशिक हवामान केंदाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे जिह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि जुन्नर तालुक्यांमध्ये शनिवार (दि. 3) पासून अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच शालेय विद्यार्थ्यांना या अतिवृष्टीचा परिणाम होऊ नये यासाठी सोमवारी (दि. 5) पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • अतिवृष्टीमुळे सोमवारी (दि. 5) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टी कायम असल्याने मंगळवारी (दि. 6) देखील सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील प्री स्कूल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सलग दुस-या दिवशी सुट्टी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.