Pune : अवकाळी पावसामुळे संचेती चौकात लोखंडी कमान पडली, शिवणे परिसरात वीज पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे आज (शुक्रवारी) दुपारी शिवाजीनगर येथील संचेती चौकातील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली. लॉकडाऊन असल्याने तिथे वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शहराच्या विविध भागात झाडे पडल्याच्या सुमारे ४० वर्दी मिळाल्याची माहिती पुणे अग्निशमन दलाकडून देण्यात आली. 

मागील दोन दिवसांपासून पुण्यात वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट करीत जोरदार अवकाळी पाऊस होत आहे. आज झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे, मोबाईल टॉवर कोसळण्याच्या घटनाही घडल्या. विश्रामबाग पोलिस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस शिपाई विठ्ठल खिलारे यांनी पोलीसांसाठी उभारलेल्या तंबूला दोन्ही हातांनी धरुन तंबुचे रक्षण केले. आज पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. आधीच कोरोनाची पुण्यात दहशत असताना आता रोज होणाऱ्या अवकाळी पावसामुळे पुणेकरांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शिवणे परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता.

दरम्यान, संचेती चौकातील कमान कोसळल्याने मंगळवार पेठेसारखी मोठी दुर्घटना टळल्याची भावना पुणेकरांकडून व्यक्त करण्यात आली. त्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा बळी गेला होता. ही दिशादर्शक लोखंडी कमान भर रस्तावर पडल्याने शिवाजीनगरला जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

अवकाळी पावसामुळे शहरात अनेक ठिकणी वृक्ष पडण्याच्या घटना घडल्या. त्याची काही दृश्ये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.