Pune : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची विकास कामे थांबली – जे.पी.नड्डा

एमपीसी न्यूज : महाविकास आघाडी सरकारच्या (Pune) अडीच वर्षाच्या काळात महाराष्ट्र राज्याचे विकासकाम थांबले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास काम होत आहे.

त्यामुळे आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्राचे नुकसान सांगितले पाहिजे. अशा भूमिका मांडत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी जे.पी.नड्डा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी अनेक मुद्यांना हात घालत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलेच सुनावले.

Chinchwad : हेल्मेट वापराबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती

यावेळी जे.पी.नड्डा म्हणाले की, एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले (Pune) होते. ज्यादिवशी शिवसेना काँग्रेससोबत जाईल. त्यादिवशी मी माझी शिवसेना बंद करेल आणि आज तसच झालं आहे. अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.