Pune : विजेवर चालणाऱ्या बसचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज- विजेवर धावणाऱ्या (ईलेक्ट्रीकल बस- ई-बस) 25 गाडय़ांची सेवा शहरवासीयांसाठी उपलब्ध करण्यात आली असून या बसचे लोकार्पण आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे , आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात 25 इ – बस व 6 तेजस्विनी बसचे लोकार्पण करण्यात आले. या 25 गाडय़ांपैकी 15 गाडय़ा पुणे शहरात तर 10 गाडय़ा पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. या सर्व गाडय़ा मिडी बस या प्रकारातील आहेत.

गाडय़ांचे प्रस्तावित मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहेत.

भेकराईनगर – पिंपळे-गुरव, नरवीर तानाजीवाडी – भेकराईनगर, हडपसर – हिंजवडी, डांगे चौक – हिंजवडी, मनपा भवन – आकुर्डी, भोसरी – निगडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.