Pune : पुण्यात आता कचरा वाहतूकीसाठी येणार इ ट्रक

एमपीसी न्यूज – शहरातील वायू प्रदुषणावर (Pune ) नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे महापालिका आता कचरा वाहतुकीसाठी इ ट्रक खऱेदी करणार आहे. या 10 ट्रक घेण्यासाठी 1 कोटी 72 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता देण्यात आली आहे.

यासाठी  महापालिकेला केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामाध्यमातून कचरा वाहतुकीसाठी इ-ट्रक विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. शहरात सध्या घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित करून तो रॅम्पवर आणला जातो. तेथून तो मोठ्या कॅम्पॅक्टरमध्ये भरून प्रकल्पांवर नेला जातो.

कसे असतील हे ट्रक –

घंटागाडीमार्फत एका वेळेत 600 ते 700  किलो कचरा गोळा केला जातो व त्यासाठी प्रति किलोमीटर सुमारे 6 रुपये खर्च येतो. हा खर्च कमी करणे व वाहतूक क्षमता वाढविण्यासाठी इ-ट्रक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या ट्रकचा वाहतूक खर्च प्रति किलोमीटर सुमारे 70 पैसे इतका आहे व एका वेळी दीड टन कचऱ्याची वाहतूक करणे शक्य आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर पर्यंत हा ट्रक धावू शकतो. त्यामुळे शहराच्या सर्व भागात, कचरा रॅम्पपासून लांब असलेल्या भागातही हा ट्रक कचरा संकलनासाठी पाठविता येणे शक्य आहे.

या एका ट्रकची किंमत सुमारे 16.45 लाख असून, जीएसटीसह याचा खर्च 1.72 कोटी पर्यंत गेला आहे. ट्रकची चार्जिंग करण्यासाठी गुलटेकडी येथील महापालिकेचा वाहन डेपो, विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था केली जाणार(Pune )आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.