Pune: कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न- महापौर

Pune: Efforts to reduce corona mortality- Mayor murlidhar mohol 'गुगल इंडिया' च्या कर्मचा-याकडून देण्यात आलेले २००० नग ऑक्झिमीटर मंगळवारी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅ्ल्यूज (आयएएचव्ही) या संस्थेकडून पुणे महानगरपालिकेस देण्यात आले.

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना पुणे महानगरपालिका राबवित आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात व झपाटयाने वाढत आहे. पुणे शहरात त्याच्या प्रादुर्भावाचे संकट गडद होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन आणि पुणे महानगरपालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्ध पातळीवर अहोरात्र राबवित आहे, असेही ते म्हणाले.

पुणे महानगरपालिकेला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेच्यावतीने कायमच मदतीचा हात दिला गेला आहे. ‘गुगल इंडिया’ च्या कर्मचा-याकडून देण्यात आलेले २००० नग ऑक्झिमीटर मंगळवारी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅ्ल्यूज (आयएएचव्ही) या संस्थेकडून पुणे महानगरपालिकेस देण्यात आले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपायुक्त डॉ. वनश्री लाभशेटवार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे उपस्थित होते.

‘गुगल इंडिया’ची त्यांच्या तत्पर सेवेसाठी ओळख आहेच. सामाजिक जाणिव ठेवून गुगल इंडियाचे कर्मचारी यांनी २००० नग ऑक्झिमीटर महानगरपालिकेला प्रदान केल्याबद्‌दल महापौरांनी सर्व कर्मचारी, पदाधिकारी तसेच आयएएचव्ही या संस्थेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.