मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune : कलापिनी तर्फे एकपात्री आणि नाट्य छटा कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज : कलापिनी संस्थेतर्फे (Pune) अनेक स्पर्धा दरवर्षी घेण्यात येतात. यावर्षी नाट्य छटा/एकपात्री अभिनय स्पर्धा 3  आणि 4 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि निवृत्त आकाशवाणी निर्माते राजेंद्र पाटणकर यांनी ही कार्यशाळा घेतली.

नाट्यछटा किंवा एकपात्री करताना अध्ययन आणि निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. नाट्यछटेमधील राग, प्रेम, हसू असे सर्व भाव चेहऱ्यावर येणे गरजेचे असते. देहबोली ही तितकीच महत्त्वाची असते. आवाजामधील चढ उतारही दाखवणे गरजेचे तसेच माइकसमोर कसे बोलावे? हे माहीत असणे पण महत्त्वाचे आहे. असे त्यांनी सांगितले.

नाट्यछटा सादर करताना वेशभूषेला महत्त्व नाही, तर अभिनयाला महत्त्व असते. नाट्यछटा त्या त्या वयोगटाला योग्य, सुखद आणि चांगला संदेश देणारी असावी असे त्यांनी सांगितले. दिवाकरांच्या नाट्यछटा या पूर्वीच्या आहेत. आता शिक्षक व पालकांनी नवीन विषयावर नाट्यछटा लिहिणे गरजेचे आहे, अशी त्यांनी सूचना केली. काही मुलांकडून वाचन आणि एखादा प्रसंग करताना काय आवश्यक आहे? ते प्रत्यक्ष करून घेतले.

Maval : उकसानमधील प्रत्येक घरात पोहोचणार स्वच्छ पाणी

तसेच, कीर्तनकार हा खरा एकपात्री कलाकार आहे. कारण (Pune) एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका तो सादर करतो. यामध्ये डिटेलिंग देहबोली आणि वेशभूषा महत्त्वाचे असते. अंगिक अभिनय महत्त्वाचा असतो आणि वेशभूषा ही महत्त्वाची असते. असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची हास्य जत्रामधील हास्य अभिनेते सागर यादव यांनी ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ या एकपात्री नाटकातील एक प्रसंग करून दाखवून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. कलापिनी तर्फे नाट्यछटा आणि बालनाट्याची पुस्तके स्पर्धकांना बघण्यासाठी ठेवण्यात आली होती. अनघा बुरसे यांनी त्याची माहिती सगळ्यांना दिली.

या कार्यशाळेला मुले व पालक यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कलापिनीचे उपाध्यक्ष श्रीयुत अशोक बकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलापिनीच्या कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे यांनी केले. कार्यक्रमासाठी रश्मी पांढरे, श्रीपाद बुरसे, संदीप मनवरे, समीर महाजन यांनी मदत केली.

कलापिनीमध्ये तीन व चार डिसेंबरला होणाऱ्या नाट्यछटा व एकपात्री स्पर्धेसाठी अतिशय मार्गदर्शक अशीही कार्यशाळा कलापिनीतर्फे घेण्यात आली.

Latest news
Related news