Pune : लवकरच वाजणार निवडणुकीचा बिगुल – दीपक मानकर

एमपीसी न्यूज – लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. (Pune) त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे, असे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर मानकर यांच्या हस्ते कोथरूड येथील पुण्याई सभागृहात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पक्षवाढीच्या दृष्टीने व संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी लवकरात लवकर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.

Pune : लवकरच वाजणार निवडणुकीचा बिगुल – दीपक मानकर

याच दृष्टीने आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षावरील निष्ठा आणि काम करण्याची ऊर्जा पाहून नियुक्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष प्रिया (Pune) गदादे, युवक काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष समीर चांदेरे, कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कोथरूड विधानसभेच्या महिला अध्यक्षा तेजल दुधाने तसेच कोथरूड युवक काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष मोहित बराटे यांच्यासह आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.