Pune : उन्हाचा तडाखा असतानाही सिद्धार्थ शिरोळे यांच्या पदयात्रांना जोरदार प्रतिसाद

एमपीसी न्यूज – गेल्या काही वर्षांत निवडणुकीदरम्यान निघणा-या प्रचारफे-या, पदयात्रा रोडावत चालल्याचे चिन्ह असताना शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारफे-या, पदायात्रांना कायकर्ते आणि स्थानिक मतदार यांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

आज, शनिवारी औंध भागातील परिहार चौक, डि. ए. व्ही. शाळा, मेडिपॉईंट हॉस्पिटल, आंबेडकर पुतळा, भाले चौक, औंध गाव गुरुद्वारा, मंगेश सोसायटी, औंध गावठाण, सिद्धार्थ नगर, भाजी मंडई, जय महाराष्ट्र चौक, रोहन नीलय सोसायटी या भागात अशीच परिस्थिती पहायला मिळाली.

परिहार चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्याबरोबर अनेक सामान्य मतदारही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शुक्रवारी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या पदाधिका-यांनी सिद्धार्थ शिरोळे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्यानंतर आजच्या पदयात्रेत त्यांचा लक्षणीय सहभाग होता. यावरून आता शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आरपीआय कार्यकर्ते देखील सिद्धार्थ शिरोळे यांना विजयी करण्यासाठी सक्रीय झाले असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी नगरसेवक परशुराम वाडेकर, सुनीता वाडेकर, मधुकर मुसळे, अर्चना मुसळे, सचिन वाडेकर, विजय शेवाळे, अनिल भिसे, गणेश गायकवाड, सुरेश चोंदे, बाळासाहेब रानवडे, गणेश केळापुरे, पौर्णिमा रानवडे आदी उपस्थित होते.

केवळ खासदार पुत्र म्हणून आजपर्यंत आम्ही सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव ऐकले होते पण गेल्या एक दीड वर्षांत पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ते करीत असलेले प्रयत्न, शहरात इलेक्ट्रिक बसेस आणण्यामधील त्यांचे योगदान या बाबी समोर येत गेल्या त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. आमच्या मतदार संघात आम्हाला असेच व्हिजन असलेला तरुण, अभ्यासू आमदार हवा, असे या वेळी अनेक स्थानिकांनी आवर्जून सांगितले. या आधी सकाळी सिद्धार्थ शिरोळे यांनी गोखले नगर परिसरातील निलज्योती येथील गजानन गार्डन, शिवाजी हाऊसिंग सोसायटी येथील प्रकाश बहिरट उद्यान आणि गोखलेनगर येथील कै. शकुंतला निकम उद्यान या ठिकाणी देखील भेट देत उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी नगरसेवक आदित्य माळवे, राजश्री काळे, डॉ. अपर्णा गोसावी, दत्ता खंडाळे, जितू मंडोरा, प्रवीण शेळके, निलेश घोडके आणि विकास डाबी आदी उपस्थित होते. याबरोबरच बोपोडी येथीळ शिवसेनेच्या शाखेला देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.