BNR-HDR-TOP-Mobile

Pune: प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार

एमपीसी न्यूज – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुरू झालेल्या प्रचाराची आज (रविवारी) सायंकाळी पाच वाजता सांगता होणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस आणि रविवार असल्याने उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघात शक्तिप्रदर्शनाद्वारे रॅली काढण्याचे नियोजन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराची सांगता आज रविवारी सायंकाळी पाचला होत आहे.

आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते यांच्या उपस्थितीत दुपारी तीनला काँगेसची महात्मा फुले मंडई येथे सांगता सभा होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस संपूर्ण प्रचाराचा आढावा घेणार आहे

भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी विधानसभेच्या सर्व सहा मतदारसंघांत रॅली काढण्यात येणार आहे.

.