Pune : विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू; ‘येथे’ दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पुणे शहर व पिंपरी – चिंचवड शहरात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र असे कार्यालय आहे. ग्रामीण 10 तालुक्यातील सर्व तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय गणेश कला क्रीडा मंच प्रदर्शन हॉल येथे, पुणे कॅन्टोन्मेंट – हॉटेल सागर प्लाझासमोर सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता कार्यालय, हडपसर – साधना विद्यालय आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज, पर्वती – स्पोर्ट्स आर्ट गॅलरी सणस मैदान, खडकवासला – तहसील कार्यालय हवेली, कोथरूड – जुने कर्वे रोड क्षेत्रीय कार्यालय रेल्वे आरक्षण शेजारी कर्वे रोड, शिवाजीनगर – नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड, वडगावशेरी – येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, भोसरी – अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर, पिंपरी – डॉ. हेडगेवार भवन निगडी प्राधिकरण, चिंचवड – पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण इमारत. विधानसभा निवडणुकीसाठी नेहमीपेक्षा नव्याने निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे.

उमेदवारांना या कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहे. 27 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. शनिवार आणि रविवार सुट्टी आहे.

सोमवार 1 ऑक्टोबर, मंगळवार 2 ऑक्टोबर गांधी जयंती सुट्टी, बुधवार आणि गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे. 4 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.