Pune : शहर आठ मतदारसंघ आणि पुणे ग्रामीण मतदारसंघाचे निवडणूक चित्र स्पष्ट; अशा होणार लढती

एमपीसी न्यूज – आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने पक्षश्रेष्ठीं, पक्षप्रमुख आदींच्या आदेशानुसार तसेच काही राजकीय खेळीनुसार काहींनी आपले अर्ज मागे घेतल्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या पुणे शहरातील आठ मतदारसंघाचे निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काहीठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती पाहायला मिळणार आहेत.

– कसबा मतदारसंघात भाजपकडून मुक्ता टिळक विरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे निवडणूक लढवणार.शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी केली बंडखोरी..कसब्यात तिरंगी लढत
– शिवाजीनगर मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे याच्या विरोधात काँग्रेसकडून दत्ता बहिरट निवडणूक लढवत आहेत…
– कोथरुडमध्ये यावेळी रंगत निर्माण होईल असे वाटत असताना अनेक उमेदवारांनी घेतली माघार.येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या विरोधात मनसेच्या किशोर शिंदे यांच्यात लढत असेल
– खडकवासला मतदारसंघात भाजपकडून भीमराव तापकीर याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन दोडके निवडणूक रिंगणात आहेत.
– हडपसर मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होते.भाजपकडून योगेश टिळेकर तर राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांच्यात लढत तर मनसेकडून वसंत मोरे निवडणूक लढत आहेत.
– कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस रमेश बागवे यांच्या विरोधात भाजपकडून सुनील कांबळे तर इकडून यांच्यात थेट लढत
– पर्वती मतदारसंघात काँग्रेस बंडखोर आबा बागुल यांनी माघार घेतल्याने भाजपच्या माधुरी मिसाळ व राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यात सरळ लढत होते.
– वडगावशेरी मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होते.भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत.

 

  • पुणे ग्रामीण विधानसभा चित्र स्पष्ट

– इंदापूरमध्ये यावेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांची लढत दत्ता मामा भरणे यांच्यात दुरंगी लढत होणार.
– बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर निवडणूक लढवत आहेत.
– दौंडमध्ये भाजपकडून राहुल कुल निवडणूक लढवत आहेत तर त्याच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रमेश थोरात निवडणूक रिंगणात आहेत.
– यावेळी पुरंदरमध्ये लक्षवेधी लढत होणार आहे.लोकसभा निवडणूक वेळी अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना कसे निवडून येतो अशी धमकी दिली.त्यामुळे शिवसेनेकडून विजय शिवतारे विरोधात काँग्रेसकडून संजय जगताप निवडणूक लढवत आहेत.
– भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या विरोधात शिवसेनेकडून कुलदीप कोंडे निवडणूक रिंगणात आहेत.
– मावळ मतदारसंघात यावेळी चुरशीची लढत आहे.ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सुनील शेळके यांची लढत भाजप राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यात लढत होणार आहे.
– खेड आळंदी राष्ट्रवादीकडून दिलीप मोहिते याच्या विरोधात शिवसेनेकडून सुरेश गोरे निवडणूक लढवत आहेत.
– जुन्नर मतदारसंघात लढत होते राष्ट्रवादीकडून अतुल बेनके निवडणूक लढवत आहेत.तर त्याच्या विरोधात शिवसेनेकडून शरद सोनवणे उभे आहेत.
– शिरूर हवेली मतदारसंघात भाजपचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अशोक पवार निवडणूक लढवत आहेत.इथल्या राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप कंद यांनी भाजपला पाठींबा दिल्याने रंगत निर्माण झालीय.
– आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे राजाराम बाणखेले निवडणूक रिंगणात आहेत.आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.