Pune electoral Roll: मतदार यादी शुद्धीकरणाबाबत पुणे जिल्ह्याची चांगली कामगिरी

एमपीसी न्यूज: भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्धीकरणाबाबत दिलेल्या निर्देशानुसार मागील दोन वर्षात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून मागील वर्षी जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या क्र. 6,7,8 आणि 8अ नमुन्यातील एकूण 13 लाख 6 हजार 71 अर्जावर अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. (Pune electoral Roll) यावर्षी 10 ऑगस्ट पर्यंत 8 लाख 14 हजार 342 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 7 लाख 28 हजार 128 अर्जावर कार्यवाही पूर्ण झालेली आहे.

 

जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडून छायाचित्र गोळा करुन त्यांचे छायाचित्र अद्ययावत करणे, किंवा मयत झालेल्या, दुबार असलेल्या व स्थंलातरीत झालेल्या मतदारांची वगळणी करण्याचे कामकाज तसेच, दुबार नोंदी असलेल्या मतदारांची पडताळणी करुन त्यांची वगळणी करण्याचे कामकाज सुरू आहे.

Pimpri News : दृष्टिहीन भगिनींच्या राख्यांनी भारावले महापालिका आयुक्त

गेल्या वर्षापासून 10 ऑगस्ट 2022 अखेर पर्यंत एकूण 4 लाख 6 हजार 589 छायाचित्र नसलेल्या मतदारांपैकी 3 लाख 94 हजार 725 छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.(Pune electoral roll) 88 हजार 724 लोकसंख्या शास्त्रीयदृष्टया समान नोंदी असलेले मतदार 88 हजार 424 दुबार मतदारांबाबत कार्यवाही पुर्ण करण्यात आलेली आहे.

 

छायाचित्र मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात छायाचित्र न जमा केलेल्या मतदारांनी त्यांचे छायाचित्र तात्काळ जमा करावेत.(Pune electoral roll) तसेच, मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मयत झालेली असलेल्या मतदारांनी फॉर्म क्र. 7 भारत निवडणूक आयोगाच्या https://nvsp.in या संकेतस्थळावरुन किंवा ‘वोटर हेल्पलाईन’या मोबाईल ॲपद्वारे भरावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

 

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्याकरीता व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6ब भारत निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ॲप आपल्या मोबाईल डाऊनलोड करुन भरता येईल.(Pune electoral roll) जिल्ह्यातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्याची कार्यवाही करावी, असे आवाहनदेखील डॉ. देशमुख यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.