Pune: पुणे शहरातील ‘इलेक्ट्रिक बाईक रेंटींग’ प्रकल्प पथदर्शी ठरेल : सतेज पाटील

Pune: 'Electric Bike Renting' project in Pune will be a pioneer: Satej Patil हा प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जिंग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता पुणे शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. यांच्यावतीने आगामी काळात राबविण्यात येणारा इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट पथदर्शी ठरेल, मी या उपक्रमाचे कौतुक करतो आणि अशा पर्यावरण पूरक उपक्रमांना शासनाचे नक्कीच पाठबळ राहील, अशा शब्दांत रविवारी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्पाच्या घोषणेचे स्वागत केले.

दि. 26 जून रोजी पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर यासंबंधीचे ट्विट परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले.

शहरामध्ये वाढते प्रदूषण व वाढती वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून ‘ग्रीन पुणे’ संकल्पनेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” ही संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असून या इलेक्ट्रिक बाईकने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी 90 पैसे प्रती कि.मी. पासून जास्तीत जास्त 4 रुपये प्रती कि. मी. खर्च पुणेकरांना येणार आहे.

प्रोजेक्टमधून माफक भाड्यात इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध होणार आहेत. या कंपनीच्या माध्यमातून या बाईक विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतील.

हा प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी 10 बाईक चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जिंग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर 500 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता पुणे शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून एकूणच शहरातील वाहतूक कोंडी, प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी पुणे मनपाला कोणतीही आर्थिक गुंतवणूक करावी लागणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.